१ जून ते ३१ जुलैदरम्यान सागरी मासेमारीवर बंदी

मुंबई : पावसाळी कालावधीत मासे व अन्य सागरी जीवांच्या प्रजोत्पादनासाठी पोषक वातावरण असल्याने दि. १ जून ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात व भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रापर्यंत (इइझेड) मासेमारी बंदी घोषित करण्यात आली आहे.

मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मत्स्य साठ्याचे जतन, खराब तसेच वादळी हवामानामुळे मच्छिमारांची जीवित व वित्त हानी यांचे रक्षण करणे तसेच शाश्वत मच्छीमार व्यवस्थापनाच्या हेतूने तसेच केंद्र शासनाच्या २२ फेब्रुवारी २०१८ च्या आदेशानुसार ही मासेमारी बंदी घोषित करीत असल्याचे मत्स्यव्यवसाय आयुक्त अरुण विधळे यांनी जाहीर केले आहे.

Comments
Loading...