विधान परिषदेत पहिल्यांदाच महिला उपसभापती, नीलम गोऱ्हेना मिळाला बहुमान

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती पदी अखेर शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांची वर्णी लागली आहे. विरोधी पक्षाचे उमेदवार योगेंद्र कवाडे यांनी माघार घेतल्याने गोऱ्हे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

माणिकराव ठाकरे यांचा कार्यकाळ संपल्यापासून उपसभापती पद खाली होते. काँग्रेसने सुरवातीपासून या पदावर दावा केला होता, मात्र विधानसभेच विरोधी पक्ष नेतेपद हवे असल्यास परिषदेचे उपसभापती पद सोडण्याची अट सत्ताधाऱ्यांकडून घालण्यात आली होती. त्यामुळे अखेर नीलम गोऱ्हे यांची उपसभापती पदी वर्णी लागली आहे.

नीलम गोऱ्हे यांचे महिला सबलीकरणा संदर्भात मोठे काम आहे, राज्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारावर गोऱ्हे यांनी कायम आवाज उठवलेला आहे. सध्या गोऱ्हे या शिवसेना प्रतोद म्हणून देखील काम पाहत आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती पदाचा बहुमान मिळलेल्या त्या पाहिल्या महिला बनल्या आहेत. नीलम गोऱ्हेच्या रूपाने पहिल्यांदाच विधानपरिषदेच्या सभापती पदी महिलेची निवड करण्यात आली आहे.