ठरलं..! भारत- ऑस्ट्रेलिया यांच्यात ३ डिसेंबरपासून पहिली कसोटी

cricket

क्रिकेट : जगात कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे लॉकडाऊन देखील वाढत आहे. याचा सर्वच क्षेत्रावर परिणाम पाहायला मिळत आहे. पण आता गेले दोन-अडीच महिने ठप्प झालेलं क्रिकेट आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलं आहे.

आता ICC ने भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्याचे वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा डिसेंबर महिन्यात नियोजित करण्यात आला असून ३ डिसेंबरपासून कसोटी मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणे ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासाठी खूप महत्त्वाचे आहे. हा दौरा रद्द झाल्यास क्रिकेट ऑस्ट्रेलियासमोरचं आर्थिक संकट अधिक गडद होऊ शकतं. याच कारणासाठी BCCI ने ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका खेळण्यास होकार दर्शवला आहे.

स्थानिक ऑस्ट्रेलियन प्रसारमाध्यमांनी बुधवारी दिलेल्या माहितीनुसार, या मालिकेसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ४ मैदानांची नाव निश्चीत केली होती. आत त्या नावांवर शिक्कामोर्तब झाले आहे.

बॉर्डर-गावसकर कसोटी क्रिकेट मालिका :

पहिली कसोटी – ३ ते ८ डिसेंबर ब्रिसबेनमध्ये, दुसरी कसोटी (दिवस-रात्र) – ११ ते १५ डिसेंबर अडलेड ओव्हलयेथे, तिसरी कसोटी (बॉक्सिंग डे) – २६ ते ३० डिसेंबर मेलबर्न तर चौथी कसोटी – ३ ते ७ जानेवारी २०२१ सिडनीला होणार आहे.

दरम्यान, कॅरेबियन बेटांवर विन्सी प्रिमीयर टी १० लीग स्पर्धा विनाप्रेक्षक सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अनेक क्रिकेट मालिकांच्या तारखादेखील निश्चित केल्या जात आहेत.

याआधी २०१८-१९ मध्ये खेळवण्यात आलेली बॉर्डर-गावसकर ट्रॉफी कसोटी मालिका भारताने २-१ ने जिंकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा कसोटी सामना पावसाच्या सततच्या व्यत्ययामुळे अनिर्णित राहिला. त्यामुळे भारताने कसोटी मालिका २-१ ने जिंकली.

#व्यक्तिविशेष : नितीन गडकरी : जे बोलतो, ते करून दाखवणारा एकमेव लोकप्रिय मराठी नेता

#coronavirus : ‘करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला केंद्र सरकार जबाबदार’

बुमराहची आयसीसी क्रमवारीत झेप पोहचला ७ व्या स्थानी