‘हर हर महादेव’च्या जयघोषाने दुमदुमली शिव मंदिर

पहिल्या श्रावण सोमवारनिमित्त भाविकांची शिवमंदिरात गर्दी

वेब टीम:-  श्रावण महिन्यातला आज पहिला सोमवार असल्यामुळे देशभरासह राज्यातही मंदिरांमध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. देशातल्या प्रत्येक शिव मंदिरात ‘हर हर महादेव’चा जयघोष करत भाविक दर्शनासाठी रांगेत उभे आहेत.

त्र्यंबकेश्वरमध्येही भाविकांची रेलचेल

श्रावण सोमवारनिमित्त आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनासाठी भर पावसात भाविकांची गर्दी दिसत आहे. ‘हर हर महादेव’, बम बम भोलेच्या जयघोषाने त्र्यंबकनगरी दुमदुमली आहे.

भीमाशंकरच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. पुण्याजवळील भीमाशंकर हे एक सह्याद्रीच्या खुशीत असलेले महादेवाचे जागरूक देवस्थान आहे. आज पहिला सोमवार म्हणून भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.