fbpx

पांडुरंग पावला ! स्थगिती नाहीच…, खा. संभाजीराजेंची पहिली प्रतिक्रिया

टीम महाराष्ट्र देशा : मराठा आरक्षणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयाला तूर्तास स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि मराठा समाज बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मराठा समाजाला राज्य सरकारने शिक्षणात 12 टक्के आणि नोकऱयांमध्ये 13 टक्के आरक्षण देण्यासाठी नुकतेच आरक्षण सुधारणा विधेयक मंजूर करून घेतले. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारने पाऊल उचलले. मात्र याला अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी हरकत घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणी राज्य सरकारला नोटीस दिली असून दोन आठवड्यानंतर स्थगितीवर सुनावणी घेण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

पांडुरंगाने वंचित समाजाला दिलासा दिला अशी पहिली प्रतिक्रिया छत्रपती संभाजी महाराज यांनी सर्वोच्च न्यायाल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर दिली. मराठा समाजाला सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास म्हणून मान्यता देण्यात आलेल्या आरक्षणाला स्थगिती देण्यास तूर्तास नकार दिला आहे. सरकारी वकिलांनी चांगले काम केले आहे. त्यांनी भक्कमपणे बाजू मांडल्याचे ते म्हणाले.