आधी ऑक्सिजन तुटवडा आता कोळसा, शेठ १८-१८ तास काय काम करतात मग?; काँग्रेसचा सवाल

मुंबई : देशात कोरोनाचं संकट आलं तेव्हा कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनची मोठ्या प्रणामात गरज भासत होती. त्यावेळी देशात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा देशाला पाहावा लागला. यावरुन केंद्र सरकावर जोरदार ताशेरे ओढले गेले. कित्येक रुग्णांना ऑक्सिजन अभावी आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे केंद्र सरकारच्या हलगर्जीपणा दाखवत सर्व नेते मंत्र्यांपासून ते सर्वसामान्य जनते पर्यंत सर्वांनीच टीकेची झोड उठवली होती. आता देशात कोळश्याच्या तुडवडा जाणवत आहे.

सद्यस्थितीत संपूर्ण देशात कोळशाच्या पुरवठ्यामध्ये तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. महावितरणने वीजपुरवठ्याचा करार केलेल्या औष्णिक वीज निर्मिती केंद्रांमध्ये कोळशाअभावी वीज निर्मितीमध्ये लक्षणीय घट सुरु आहे. तर वाढत्या तापमानामुळे विजेच्या मागणीत देखील वाढ होत आहे. परिणामी विजेची मागणी व उपलब्धता यातील तफावत भरून काढण्यासाठी विविध उपाययोजना व सोबतच विजेचे भारनियमन टाळण्यासाठी महावितरणकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. याच पार्श्वभूमीवर मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

आधी ऑक्सिजन तुटवडा आता कोळसा, शेठ १८-१८ तास काय काम करतात मग?, असा खोचक सवाल भाई जगताप यांनी केंद्र सरकारला केला आहे.

दरम्यान, कोळसा टंचाईच्या मुद्द्यावरुन शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊतांनीही सामना अग्रलेखातून केंद्र सरकारवर ताशेरे ओढले होते.

महत्वाच्या बातम्या