…आधी आपल्या बापांची नावं बदला !- शिवसेना

uadhav thakre

मुंबई: ज्यांना नावं बदलून ‘बाजार’ मांडायचा आहे, त्यांनी आधी आपल्या बापांची नावं बदलून यावं, अश्या तीव्र शब्दात उद्धव ठाकरे यांनी सामनातून निशाणा साधला आहे. शहरातील अनेक भागांची नावं बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या बिल्डर लॉबीवर त्यांनी ताशेरे ओढले.

नेमकं काय म्हटले आजच्या सामनात ?

“मुंबईतील अनेक नगरे-उपनगरांची नावे परस्पर बदलण्याचा सपाटा लावला आहे. त्यांच्या पाठीवर धपाटा मारला जाईल. परळ, दादर, गिरगाव, वडाळा व शीव, भायखळा, चिंचपोकळी ही त्याच नावाने ओळखली जातील. ज्यांना या ‘गावां’ची नावे बदलून अप्पर वरळी, न्यू कफ परेड वगैरे करून ‘बाजार’ मांडायचा आहे त्यांनी आधी आपल्या बापांची नावे बदलून यावे.”Loading…
Loading...