fbpx

पहिल्या मराठा जात प्रमाणपत्राचा पालकमंत्र्याच्या हस्ते निलंग्यातून शुभारंभ

निलंगा – मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत निर्णय झाल्यानंतर जातीचे प्रमाणपत्र निर्गमित करण्याचे आदेश शासनाने सर्व यंत्रणेला दिले त्याचाच एक भाग म्हणून पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते तालुक्यातील 16 युवकांना शुक्रवारी ता. 14 रोजी मराठा जातीच्या पहील्या जातप्रमाणपत्राचे प्रातिनिधीक स्वरूपात वाटप करून शुभारंभ करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाने प्रथमच अधिसूचना काढून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मोठ्या प्रमाणात आधिकारी भरतीची जाहीरात प्रसिद्ध केली असून त्यात मराठा समाजासाठी आरक्षित जागा दिल्यामुळे स्पर्धा परिक्षा तयारी करणाऱ्या युवकामध्ये समाधानाचे वातावरण आहे. निलंगा मतदार संघात मराठा समाजाची मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून मराठा जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या होत्या त्याचाच एक भाग म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात प्रगती सोंळूके सावनगिरा, उमेश सोंळूके सावनगिरा. जयश्री जाधव दापका, शुभम माने अनसरवाडा, नामदेव सूर्यवंशी माकणी, शिवनंदा आरीकर निलंगा, माधव सुभेदार निलंगा, वासूदेव कदम खडकउमरगा अशा 16 विध्यार्थांना मराठा जातप्रमाणपत्राचे वाटप पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपविभागीय आधिकारी विकास माने, तहसीलदार विक्रम देशमुख, नायबतहसीलदार सौदागर तांदळे, दगडू सोंळूके, समाजकल्याण सभापती संजय दोरवे यासह आदी उपस्थित होते. मराठा समाजाला जातीचे प्रमाणपत्र तत्काळ देण्याच्या सूचना करून जिल्ह्यात पहील्यांदाच निलंगा येथे पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप केले असल्याने सर्वच स्तरातून आनंद व्यक्त केला जात आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्याचा शासनाचा ऐतिहासिक निर्णय असून हे आरक्षण सर्व कायदेशीर बाबीचा आभ्यास करून देण्यात आले आहे. या आरक्षणाचा समाजातील तरूण युवकांनी अधिक लाभ घ्यावा असे अवाहन पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी केले.