‘अतरंगी रे’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक पर्वणी

‘अतरंगी रे’ सिनेमाचा फर्स्ट लूक रिलीज, अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक पर्वणी

Akshay Kumar,Sara Ali Khan

मुंबई : नुकताच अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘सुर्यवंशी’ हा सिनेमा सर्वत्र सुपरहिट ठरला. त्यानंतर आता ‘अतरंगी रे’ (‘Atarangi Re’) सिनेमाच्या माध्यमाने चाहत्यांसमोर येणार असून नुकताच त्याचा ‘फर्स्ट लूक’ रिलीज करण्यात आला. यामुळे अक्षय कुमारच्या चाहत्यांना आणखी एक पर्वणी मिळणार असल्याने चांगलीच चर्चा रंगत आहे.

नुकताच शेअर केलेल्या फर्स्ट लूक व्हिडीओमधून समजते आहे की सारा अली खानचे (Sara Ali Khan)नाव रिंकू आहे, जी प्रेमात वेडी आहे. तर धनुष (Dhanush) चित्रपटात विशूच्या भूमिकेत दिसणार आहे. सारा अली खानने अक्षय कुमारचे मोशन पोस्टर शेअर करून लिहिले की, प्रत्येकवेळी अतरंगी स्टाईलमध्ये एंट्री करतात. त्यांची ताकद आणि प्रेम बघून सर्वजण पराभूत होतात. तर अभिनेता धनुषचे पोस्टर शेअर करताना ती म्हणाली, ‘विशूला भेटा, हे चित्रपटातील आमचे पहिले पात्र आहे. जे इतर कोणी करू शकले नसते’. तसेच अक्षय कुमारने सारा अली खानचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. त्याला कॅप्शन देताना तो म्हणाला, ‘ही मुलगी प्रेमात वेडी झाली आहे. भेटा अतरंगी नंबर एक रिंकूला’.

‘अतरंगी रे’ हा दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा दिग्दर्शक आनंद एल रायसोबतचा दुसरा सिनेमा आहे. या दोघांनी यापूर्वी ‘रांझना’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, कलर येलो प्रॉडक्शन आणि केप ऑफ गुड फिल्म्स यांनी केली आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणाला २०२० मध्ये सुरुवात झाली होती. आता प्रेक्षकांना या चित्रपटाचा लवकरच आस्वाद घेता येणार असल्याने अक्षय कुमारच्या चाहत्यांमध्ये ‘अतरंगी रे’ बद्दल उत्सुकता लागली आहे.

‘अतरंगी रे’ सिनेमातील पहा फोटो.

महत्वाच्या बातम्या