पहिल्या दिवशीच्या लसीकरणात गंभीर दुष्परिणाम नाहीत; शंका घेणाऱ्यांना अमित शहांचा टोला

amit shah

नवी दिल्ली:- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कालपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कारण, कालपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. सीरम इन्स्टिट्यूट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठाने संयुक्तरित्या निर्माण केलेली ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लस पहिल्या टप्प्यात कोरोनायोद्ध्यांना दिल्या जाणार आहेत.

लसीकरणाच्या या कार्यक्रमावर कॉंग्रेसने काही प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर समाजवादी पक्षानेही कॉंग्रेसचा सूर ओढत केंद्र सरकारवर टीका केली होती. विरोधी पक्षांनी अशा प्रकारचे आरोप करताच त्याला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ.हर्षवर्धन आणि आरोग्य राज्यमंत्री अश्विनी चौबे यांच्यासोबत अनेकांनी कोरोनाची लस सुरक्षित असल्याचं सांगितलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, कोरोनाविरोधात सर्वात यशस्वी लढाई भारताने लढली आहे. मला दु:ख आहे की काही लोक यामध्ये राजकारण करत आहेत. माझी या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी मिळून संपूर्ण देशाला या लसीच्या सुरक्षिततेबद्दल विश्वास दिला पाहिजे. संपूर्ण देशाला लसीकरणाच्या या अभियानात जोडलं पाहिजे.

दरम्यान, मागील काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक लस निर्मिती करण्यावर काम सुरु होतं. कित्येक संस्था, शास्त्रज्ञ लसनिर्मिती करण्यासाठी प्रयत्न करत होते. संशोधकांचे हे प्रयत्न यशस्वी झाले असून आता संपूर्ण देशात प्रत्यक्ष लसीकरणास सुरुवात झाली आहे. या लसीकरणाच्या कार्यक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल उद्धाटन केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद देखील साधला.

महत्वाच्या बातम्या