पुण्यात भर दिवसा तरुणावर गोळीबार

blank

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात आज पावणे बाराच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या हल्लेखोरांनी तरुणावर गोळीबार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. समीर एनपुरे (वय २६, रा. मेहंदळे गॅरेज) असे गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. ऐन वर्दळीच्या वेळीच हा प्रकार घडल्याने चौकात धावपळ उडाली होती. दरम्यान हल्लेखोर गोळीबार करून पसार झाले. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पुढील तपास सुरु केला आहे.

दरम्यान, गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाला तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. किरकोळ वादातून गोळीबार झाला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. समीर हा सेनापती बापट रस्त्याने विद्यापीठ चौकात आला होता. त्यावेळी सिग्नल लागल्याने तो थांबला होता. त्यावेळी हल्ला करणारा तरुण मागील बाजूने दुचाकीवरुन आला. त्याने जवळून समीरवर एक गोळी झाडली. त्यानंतर तो पाषाणच्या दिशेने पसार झाला.

वैभवला आम्ही सर्व मदत करू : सनातन संस्था