पोलीस उपनिरीक्षकावरच झाडली गोळी ; तिघांना अटक

Looted cash of Rs 10 lakh showing pistol threat

टीम महाराष्ट्र देशा : आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिस उपनिरीक्षकावर गोळी झाडल्याची धक्कादायक घटना  घडली . काल शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास पुणे-मुंबई रोडवर साते गावाच्या हद्दीत असलेल्या फ्लेवर्स फॅमिली रेस्टॉरंट येथे  हा प्रकार घडला आहे.नितिन मोहिते असे गोळीबारात जखमी झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी पोलिसांनी दादा बाळू ( वय ३७ रा.पुनावळे ता.मुळशी), संतोष उर्फ बिट्या बाळासाहेब गायकवाड (वय २१), सुनिल विलास पालखे (वय २७, रा. दोघेही रा.जांबे ता.मुळशी) या तिघांना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फ्लेवर्स हॉटेलच्या पार्कींगमध्ये मनोज सिध्दाया तेलगु व त्याचे अन्य मित्र रा.देहूरोड यांचा दादा ढवळे यांच्यासोबत वाद झाला होता. ही घटना पोलिसांना समजताच पोलिस उपनिरिक्षक नितीन मोहीते त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी गेले. दरम्यान तेथील दादा ढवळे हा टॉयलेटमधून बाहेर येत असताना मोहिते यांनी त्याला थांबवले. आणि त्यातच झालेल्या झटापटीत त्याने कमरेला असलेला पिस्तूल काढून मोहिते यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर गोळी झाडली.

या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडील पिस्तूल जप्त केले. तसेच यातील जखमी अवस्थेत असलेल्या पीएसआय मोहिते यांना सोमाटने फाटा येथील खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले .डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून त्यांच्या मांडीतील गोळी काढली असून त्यांचावर उपचार सुरु आहेत.