पुण्यात बिल्डरवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू

golibar

पुणे : पुण्यात प्रभात रोडवर बांधकाम व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. देवेंद्र शहा असं या बांधकाम व्यावसायिकाचं नाव असून उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर शहा यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. शनिवारी रात्री साडे अकराच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, डेक्कन परिसरातील प्रभात रोडवर बिल्डर देवेंद्र शहा यांच्या घराजवळ शनिवारी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. शहा यांना जीवेमारण्याच्या उद्देशाने मोटरसायकलवरुन आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांच्यावर ५ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात शहा गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. खंडणी प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.