Share

PAK vs ENG | इंग्लंडचे वास्तव्य असलेल्या हॉटेलजवळ गोळीबार, संघातील खेळाडूंना बसला जोरदार धक्का

PAK vs ENG | मुलतान: सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यादरम्यान गुरुवारी पाकिस्तान मधील मुलतान शहरांमध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. इंग्लंड संघ कर्णधार बेन स्ट्रोक्स च्या नेतृत्वाखाली तब्बल सतरा वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर कसोटी सामना खेळण्यासाठी आला आहे. अशा परिस्थितीत इंग्लंड संघाचे वास्तव्य असलेल्या हॉटेलपासून एक किलोमीटरच्या अंतरावर गोळीबार झाला आहे. पाकिस्तान दौऱ्यावर असलेल्या इंग्लंड संघाने रावळपिंडी येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकला होता. तर दुसरा कसोटी सामना शुक्रवारपासून सुरू होणार होता. तर, दुसरा सामना सुरू होण्याच्या आधी हा गोळीबाराचा प्रकार घडून आल्याने इंग्लंड संघाच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे.

तीन सामन्याच्या या कसोटी मालिकेमध्ये इंग्लंड संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तर दुसरा सामना आजपासून सुरू होणार आहे. हा दुसरा सामना पाकिस्तान मधील मुलतानच्या क्रिकेट मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी इंग्लंड संघ मैदानापासून थोड्या अंतरावर असलेल्या एका हॉटेलमध्ये वास्तव्य करत आहे. त्या हॉटेलपासून एक किलोमीटर अंतरावर गुरुवारी गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, या गोळीबाराच्या प्रकारानंतर पाकिस्तानी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. इंग्लंडचा संघ मैदानावर सराव करण्यासाठी निघायच्या थोडावेळ आधी हा प्रकार घडल्याने, सगळीकडे खळबळ उडाली आहे. गोळीबार झाल्यानंतरही इंग्लंड संघाने सरावाला जाण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामन्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

2009 मध्ये श्रीलंकन संघाच्या बस वर पाकिस्तान दौऱ्यादरम्यान दहशतवादी हल्ला झाला होता. लाहोर येथील गद्दाफी मैदानावर जाणाऱ्या श्रीलंकन संघाच्या बस वर 12 दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता. या हल्ल्यामध्ये सुदैवाने कोणत्याही खेळाडूला गंभीर दुखापत झाली नव्हती. या घटनेनंतर श्रीलंकन संघाला मैदानावर हेलिकॉप्टर बोलवून सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर जवळजवळ एक दशकाहून जास्त काळ कोणताही परदेशी संघ पाकिस्तानमध्ये दौरा करण्यास गेला नव्हता.

महत्वाच्या बातम्या :

PAK vs ENG | मुलतान: सध्या पाकिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध इंग्लंड (PAK vs ENG) कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्यादरम्यान गुरुवारी …

पुढे वाचा

Cricket Sports

Join WhatsApp

Join Now