जम्मूमध्ये पाकिस्तानकडून गोळीबार; एक जवान जखमी

जम्मू : जम्मूमधील अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. भारतीय लष्करानेही या गोळीबाराला प्रत्यूत्तर दिले. पाकिस्तानकडून आज सकाळी पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबाराला प्रत्यूत्तर देत असताना सीमा सुरक्षा दलाचे जवान केके. अप्पा राओ जखमी झाले. त्यांना जम्मूमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.