अग्निशामक दल म्हणजे विघ्नहर्ताचे रूप – शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

पुणे : प्रतिनिधी- कोणत्याही आपत्तीमध्ये  असताना आपणास सर्वप्रथम अग्निशामक दलाची आठवण येते. किंबहुना आपत्ती आल्याशिवाय आपणाला त्यांची आठवण येत नाही.
त्यामुळे संकटकाळी धावून येणारा अग्निशामक दलाचा प्रत्येक जवान हा साक्षात विघ्नहर्ताचे रूप आहे . मी त्यांच्या  निरपेक्ष सेवेला वंदन करतो त्यांच्या या धाडशी व तत्पर कार्यशैलीबद्दल त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो असे प्रतिपादन शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केले.
स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात ए्का बुडणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवणाऱ्या पुणे अग्नीशामक दलातील फायरमन दादासाहेब यादव यांचा सन्मान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते कै. शंकरराव भोई प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
गणेशोत्सव मिरवणुकीत आपली सेवा बजावताना सकाळी 9 च्या दरम्यान पांचालेश्वर घाट येथे दादासाहेब यादव यांना एक व्यक्ती वाहत जात असताना दिसली , पाण्याची पातळी आणि वेग जास्त असताना यादव यांनी नदीत ऊडी  मारून कुमार साळुंखे या व्यक्तीचा जीव वाचवला या कमी फायरमन सचिन आवळे यांनी ही मदत केली या कामगिरीची दाखल घेऊन. अग्निशामक दलातील जवानांचे कौतुक आणि त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ. मिलींद भोई यांनी दिली. या प्रसंगी स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ. शिवाजी पवार , दत्तवाडी पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.