दिवाळीपूर्वीच भारतात फटाके फुटणार! ‘या’ तारखेला रंगणार भारत-पाक क्रिकेट रणसंग्राम

मुंबई : भारत आणि पाकिस्तान दोन्ही देश हे शेजारी असले तरी त्याच्यांतील राजकीय वादामुळे ते एकमेकांचे प्रतिद्वंदी बनले आहे. यात क्रिकेटच्या मैदानात जेव्हा हे दोन्ही प्रतिस्पर्धी एकमेकासमोर येतात तेव्हा हा केवळ सामना उरत नाही. तर ही अस्तीत्वाची लढाई असते, धर्मयुद्ध असते.

यावर्षी होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या ग्रुपची घोषणा झाली तेव्हा भारत आणि पाकिस्तान संघाचा एकाच गटात समावेश करण्यात आला. यामुळे भारत आणि पाकिस्तान संघात क्रिकेट सामना रंगणार हे नक्की झाले होते. आता केवळ प्रतिक्षा होती ती तारखेची. यादरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार आगामी टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान सामना हा २४ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र या वृत्ताला अद्यापही आयसीसीने अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
मात्र जर हा सामना याच तारखेला झाला तर भारतात दिवाळीपुर्वीच फटाके फुटणार हे नक्की.

कारण विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान संघात आतापर्यंत झालेल्या एकाही सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे या सामन्यातही भारत विजयी होणार हे प्रत्येक भारतीय ठामपणे सांगु शकतो. गेल्या काही वर्षापासून दोन्ही क्रिकेट संघ एकमेकाविरोधात क्रिकेटच्या मैदानात केवळ आयसीसीच्या मालिकेत भीडत असतात. त्यामुळे दोन्ही देशाचे क्रिकेट रसीक या सामन्याची आतुरतेने वाट बघत असतात.

महत्त्वाच्या बातम्या