‘दिल्लीत यंदा फटाक्यांवर असणार बंदी’, केजरीवाल सरकराचा निर्णय’

ARVIND KEJRIWAL

नवी दिल्ली: यंदा दिवाळीत दिल्लीमध्ये फटाके फोडण्यास बंदी असणार आहे. दिल्लीत वायू प्रदूषण वाढत असल्याने मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच यंदा दिल्लीत सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवण, विक्री आणि वापरावरदेखील बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.

त्यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे की, ‘गेल्या ३ वर्षांपासून दिवाळीच्या वेळी दिल्लीच्या प्रदूषणाची धोकादायक स्थिती पाहता, गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी देखील सर्व प्रकारच्या फटाक्यांच्या साठवणुकीवर, विक्रीवर आणि वापरावर संपूर्ण बंदी घातली जात आहे. जेणेकरून लोकांचे जीव वाचवता येतील. तसेच गेल्या वर्षी, व्यापाऱ्यांनी फटाके साठवल्यानंतर, प्रदूषणाचे गांभीर्य पाहता उशीरा पूर्ण बंदी घालण्यात आली, ज्यामुळे व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी फटाक्याची साठवण न करण्याचे आवाहन सर्व व्यापाऱ्यांना करण्यात येत आहे.’ असे ट्वीट केजरीवाल यांनी केले आहे.

दिल्लीत सर्वाधिक वायू प्रदूषण असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.

महत्त्वाच्या बातम्या