पुण्यात स्कूल व्हॅॅन ला आग

पुणे : पुण्यातील वारजे परिसरात एका स्कूल व्हॅॅनला आग लागल्याचा प्रकार घडला . स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नाही. शानू पटेल हायस्कूल या इंग्रजी तसेच मराठी माध्यमाच्या शाळेची हि बस असल्याचं समोर आलं आहे.

आग लागली त्यावेळी व्हॅॅनमध्ये फक्त चालकच होता. आग लागताच चालकाने रस्त्याच्या कडेला व्हॅॅन उभी करून स्थानिक नागरिकांकडे मदत मागितली. नागरिकांनी देखील सतर्कता दाखविल्यामुळे आग आटोक्यात आणता आली.