कायर येथील स्टेट बँकेच्या उपशाखेला आग

sbi

 

संदेश कान्हु (जिल्हा प्रतिनिधी) यवतमाळ; वणी तालुक्यातील कायर या गांवातील स्टेट बँकऑफ इंडियाच्या उप शाखेला आज सकाळी अचानक आग लागली. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले असल्याचा प्रथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आज सकाळी बैंक उघडण्याच्या अगोदर 9 च्या सुमारास बँकेमधून मोठ्याप्रमाणावर धुर निघताना स्थानिक नागरिकांच्या लक्षात आले . स्थानिक नागरिकांनी सतर्कता दाखवत या प्रकारची माहिती बैंक मैनेजर व अगिशमक दलाला देण्यात आली.त्यानंतर अग्निशमन दलाने ही आगीवर नियंत्रण मिळवत अटोक्यात आणली . या आगीत एसी, लैपटॉप, संगणक व फर्नीचर जळून खाक झाले . बँकेच्या दिलेल्या माहितीनुसार नुकसान नक्की किती लाखांचे झाले हे जरी स्पष्ट सांगितले नसले तरी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची शक्यता महाराष्ट्र देशाच्या प्रतिनिधीशी बोलताना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली . दरम्यान शॉर्टसर्किट मुळे आग लागल्याचा अंदाज अग्निशमन दलाकडून वर्तविला जात आहे.