मुंबई: उपनगरातील असल्फा परिसरात आज सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. असल्फा परिसरातील झोपडपट्टीला लागून काही व्यावसायिक गाळे आहेत. या गाळ्यांपैकी एका जागेत ही आग लागली आहे. दरम्यान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आहे.
सध्या अग्निशमन दलाच्या तीन गाड्या आणि पाण्याचे टँकर्स याठिकाणी आग विझवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.दरम्यान असल्फा परिसर हा डोंगराळ भाग आहे. याठिकाणी डोंगरावर मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आहे. त्यामुळे आग अजून भडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान आगीमुळे अद्याप जीवितहानी झाल्याचे कोणतेही वृत्त समोर आलेले नाही. तसेच आग लागल्याचे समजताच स्थानिकांनी गाळ्यांमधील काही कामगारांना बाहेर पडले आहेत.
पाहा व्हिडिओ-
महत्वाच्या बातम्या:
- गृहनिर्माण सोसायट्यांवर लादण्यात आलेल्या अवाजवी निवडणूक खर्चाबाबत शेलारांचे बाळासाहेब पाटील यांना पत्र
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
- ज्ञानज्योती सावित्रीबाई आणि जोतिबा फुले यांना “भारतरत्न” मिळाला पाहिजे- रुपली पाटील ठोंबरे
- राहुल द्रविडने मधल्या फळीतील फलंदाजांना दर्शवला पाठिंबा
- योगी सरकारची कायदा आणि सुव्यवस्थेवर पकड; मोदींकडून कौतुक
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<