पुण्यात अग्नितांडव : साड्यांच्या दुकानाला लागलेल्या आगीत ५ कामगारांचा मृत्यू

टीम महाराष्ट्र देशा :पुण्यामध्ये आज पहाटे अग्नितांडव पाहायला मिळाले. देवाची उरळी येथील राजयोग साडी सेंटर या साडीच्या दुकानाला लागलेल्या आगीमध्ये ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. आग लागल्याने झालेल्या धुराने गुदमरून आणि होरपळून त्यांचा मृत्यू झाला. सर्व पाचही कामगार हे बाहेरच्या राज्यातील होते अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

दरम्यान, पहाटे ४.३० च्या सुमारास ही आग लागल्याचे अग्निशमन दलाला सूचना मिळाली त्यानंतर अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि दहा टँकरच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात यश आलं आहे. या आगीत राकेश रियाड, धर्माराम बडीयासर, राकेश मेघवाल, सूरज शर्मा आणि धीरज चांड या ५ कामगारांचा मृत्यू झाला आहे.

Loading...

या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने मोठा आर्थिक हानीही झाली आहे. या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

‘या’ तारखेपासून रेल्वे तिकीट बुकिंगला होणार सुरुवात?
कोरोनाला घालवण्यासाठी देशाला 21 नाही तर 49 दिवसांच्या लॉकडाऊनची गरज !
चीनने पाकिस्तानची केली क्रूर चेष्टा; N-95 मास्क ऐवजी चक्क अंडरवेअर पासून बनविलेले मास्क पाठवले
कनिका कपूरच्या तब्ब्येतीबाबत डॉक्टरांनी केला वेगळाच दावा
तळीरामांना दारूवाचून राहावेना; पठ्ठ्यांनी 'यूट्यूब'वर पाहून घरीच तयार केली दारू
आज सांयकाळी आणि उद्या सकाळी दुध मिळणार नाही कारण.....
कोरोनामुळे उद्धव ठाकरे सरकारचे भवितव्य टांगणीला ; वाचा 'काय' आहे प्रकरण
निलंग्यातील मज्जीदमधून १२ परप्रांतीय पोलिसांच्या ताब्यात !
प्रसिद्धीची पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना गरज नाही, देशमुखांनी आव्हाडांना झापलं
अमेरिकेत 'कोरोना'चं थैमान; डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींकडे मागितला 'मदतीचा हात'