fbpx

पुण्यात लाल महालासमोरील सायकल दुकानाच्या गोदामाला भीषण आग 

टीम महाराष्ट्र देशा : पुण्यातील शनिवारवाड्याजवळील लाल महालासमोर असलेल्या सायकल दुकानाच्या गोदामाला पहाटे साडेपाचच्या सुमारास भीषण आग लागली. ४ तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले. पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास या बेसमेंटमधील गोदामाला मोठ्या प्रमाणावर आग लागली.
लाल महालासमोरील एक चार मजली इमारत असून तिचा तळमजल्यावर दुकाने आहेत तर वरचे मजले रहिवासी राहतात. इमारतीच्या बेसमेंटमध्ये त्यांनी दोन गोदाम काढली होती. त्यात सायकली व स्वेटर व इतर माल ठेवला होता. तिचा धूर वर राहणाऱ्या लोकांच्या घरात गेल्याने त्यांना आग लागल्याचे समजले.भीषण आग आतल्या आत धुमसत असल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर धूर येत होता.
अग्निशामक दलाच्या जवानांनी धूर काढण्यासाठी सर्किट ब्रेकर, बीए सेट, ब्लोअर कॉक्रिट हॅमरचा वापर करुन गोदामाच्या भिंती पाडल्या़ त्यानंतर त्यावर पाण्याचा मारा करुन आगीपर्यंत पोहचले.अखेर ४ तासाच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझविण्यात यश आले.