अजित पवारांच्या फार्म हाऊसला भीषण आग

टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांच्या मुळशी येथील फार्महाऊसला मोठी आग लागल्याची घटना घडली आहे. घोटवडे फाट्यापासून काही अंतरावर मुळा नदीच्या काठावर हा फार्महाऊस आहे. संध्याकाळी ६:३० च्या सुमारास ही घटना घडली.

अजित पवार यांच्या फार्महाऊसला आग लागल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली आली. परंतु ही आग कशामुळे लागली याची कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. कदाचित शाॅॅर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्यता आहे.

दरम्यान, फार्म हाऊसला लागलेली आग एवढी भीषण होती ही आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. फार्महाऊस शेजारी असलेल्या रस्त्यावरुन दूरुनच धुराचे लोळ दिसत होते. त्यामुळे या आगीत मोठे नुकसान झाले असल्याची शक्यता आहे. आता मात्र आग विझली आहे.