परभणी कृषी विद्यापीठात कुलगुरूंच्या केबिनजवळील हॉलमध्ये आग, एसी-खुर्च्या जळून खाक

Fire breaks out in Parbhani Agricultural University, AC-chairs burnt to ashes due to short circuit

परभणी : येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीतील एका बैठक हॉलमध्ये शुक्रवारी सकाळी लागलेल्या आगीने एकच खळबळ उडाली. प्राथमिकदृष्ट्या शॉटसर्किटमुळे ही लाग लागल्याचे सांगण्यात येत आहे. या आगीत एसीसह खुर्च्या व अन्य साहित्य जळाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना शुक्रवारी (दि.23) सकाळी अकराच्या सुमारास घडली. यावेळी कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्यासह अन्य अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले होते.

कृषी विद्यापीठातील आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास कुलगुरूंच्या केबिनच्या बाजूस असलेल्या एका हॉलमधून अचानक धूर निघू लागला.

तेथे उपस्थित असलेल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनी तातडीने ही बाब अग्निशमन दलास कळवली. माहिती मिळताच अग्नीशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी बंब घेऊन घटनास्थळी हजर झाले. त्यांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवून मोठा अनर्थ होण्यापासून रोखला.

महत्त्वाच्या बातम्या