fbpx

मुंबईत अग्नीतांडव : एमटीएनलच्या इमारतीला भीषण आग

टीम महाराष्ट्र देशा : मुंबई वांद्र्यात एमटीएनलच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमनदलाच्या चौदा गाड्या दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे. शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागली असल्याच सांगितल जात आहे.

एमटीएनलच्या इमारतीला लागलेल्या आगीत अजून तरी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र जवळपास १०० जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्याला आग लागली आहे. आग लागताच इमारतीतल्या काही कामगारांनी गच्चीकडे धाव घेतली आहे.