Pune: भोसरी भूखंड प्रकरणी गुन्हा दाखल

भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणी खडसे यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई: राज्याचे माजी महसुलमंत्री एकनाथ खडसे भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदी प्रकरणी  गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, या प्रकरणाची उच्च न्यायालयात सुनावनी होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, असे आदेश उच्च न्यायालयानेच दिले होते. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसारच खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे येथील बंडगार्डन पोलिस स्थानकात खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. लाचलुचपत प्रतिबंद विभागाने हा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी उच्च न्यायालयात उद्या (मंगळवार) सुनावनी होणार आहे. खडसे यांच्या जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी पारदर्शीपणे व्हावी यासाठी हे संपूर्ण प्रकरण तपासासाठी एसीबीकडे सूपर्त करण्यात आले होते.

आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावत एकनाथ खडसे यांनी यापूर्वीही पोलीसी आणि इतर यंत्रणांमार्फत माझी चारवेळा चौकशी करण्यात आली. त्या सर्व चौकशीत माझ्यावरील आरोपात काहीच तथ्य आढळले नाही. उच्च न्यायालयात पोलिसांनीही हिच माहिती दिली. तसेच, ही चौकशी सुरू होती. तेव्हा माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. त्यामुळे न्यायालयाने आता गुन्हा दाखल करून चौकशी करण्याच आदेश दिले आहेत. पण, या चौकशीतही काहीही निष्पन्न होणार नाही, असा विश्वासही खडसे यांनी व्यक्त केला आहे.