दापोलीमध्ये बैलगाडी शर्यती प्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल

दापोली : दापोली तालुक्यातील अंजार्ले गावात बैलगाडी शर्यत घेतल्याप्रकरणी आयोजकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयोजक विश्वास महाडिक सुर्वे यांच्यासह काही जणांविरोधात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात सर्वत्र बैलगाडी शर्यतीला बंदी असतानाही अंजार्ले गावात बैलगाडी शर्यत घेण्यात आली होती. कार्तिकी उत्सवानिमित्त अंजार्ले येथील समुद्र किना-यावर ही स्पर्धा घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या शर्यतींमध्ये अनेक बैलांना जखमा झाल्या आहेत. लाडघर, सालदुररे, मुर्डी येथील बैलगाड्यांसह तालुक्यातील बैलगाड्या या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या.

Comments
Loading...