नगर: बाळासाहेब पवार आत्महत्येप्रकरणी 4 जनांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

अहमदनगर/प्रतिनिधी : मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनातील आघाडीचे कार्यकर्ते आणि ओम प्रकाश समूहाचे संचालक बाळासाहेब पवार यांच्या आत्महत्येप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात 4 जनांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नवनाथ विठ्ठल वाघ यास कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे.

ओम प्रकाश समुहाचे संचालक बाळासाहेब पवार यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती, याप्रकरणी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती . की सावकारी जाचाला कंटाळून आत्महत्या करत आहे. तसेच सबंधितांची नावे ही चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आली होती. मात्र पोलीस प्रशासन आरोपींना अटक करण्यात कानाडोळा करत असल्याच पहायला मिळाल होत. अखेर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नवनाथ वाघ यास अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध घेतला जात आहे.