भीमा कोरेगाव प्रकरणात चर्चेत आलेले मनोहर उर्फ संभाजी भिडे गुरुजी नेमके कोण आहेत?

Sambhaji-Bhide guruji

टीम महाराष्ट्र देशा: सोमवारी म्हणजेच काल भीमा कोरेगाव येथे झालेली दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड केल्या प्रकरणी एक नाव सध्या चर्चिल जात आहे ते म्हणजे संभाजी भिडे गुरुजी. या प्रकरणी भिडे गुरुजींच्या विरोधात पिंपरीमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Loading...

Sambhaji-Bhide guruji

भिडे गुरुजींच नाव वादात सापडण्याची हि पहिलीच घटना नाही. मध्यंतरी वारी दरम्यान त्यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेचे कार्यकर्ते ‘भक्ती-शक्ती’ संगमाच्या नावावर थेट तलवारी घेवून वारकऱ्यांमध्ये घुसले होते. यावेळी टाळ-मृदुंगाच्या ठिकाणी तलवारधारी लोक घुसल्याने काही काळासाठी पुण्यातील एफसी रोडवर दिंडी थांबवण्यात आली होती.

२००८ साली आलेल्या जोधा-अकबर या सिनेमाला विरोध करताना त्यांनी सिनेमाचे पोस्टर फाडले होते. इतकंच नाही तर आपल्या कार्यकर्त्यांसोबत त्यांनी या सिनेमाचं स्क्रिनिंगही बंद पाडलं होतं कोण आहेत भिडे गुरुजी…

८७ वर्षीय असणारे भिडे गुरुर्जी याचं नाव मनोहर भिडे आहे, त्यांना संभाजी भिडे म्हणून देखील ओळखल जात. मात्र त्यांचे समर्थक ‘भिडे गुरुजी’ म्हणूनच त्यांना संबोधतात. त्यांच्या संभाजी नाव लावण्यावर आजवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे.

पश्चिम महाराष्ट्राच्या पट्यात भिडे गुरुजींना मानणाऱ्याची संख्या हजारोंमध्ये आहे. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका रॅलीत ‘भिडे गुरुजींनी मला इथं आमंत्रित केलेलं नाही तर मी त्यांच्या हुकूमावरून इथे आलोय’ असं वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात ही घटना चर्चेचा विषय बनली होती.

Sambhaji-Bhide guruji

हिंदुत्ववादी कार्यकर्ते असलेले भिडे गुरुजी यांनी पुणे विद्यापिठातून फिजिक्समध्ये गोल्ड मेडल पटकावलेल आहे. पुढे त्यांनी एफसी कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नौकरी केली. मात्र पुढे ते आरएसएसमध्ये सहभागी झाले. भिडे गुरुजी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संपूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम केल.

भिडे गुरुजी हे त्यांच्या साध्या राहनीमानामुळे देखील कायम चर्चेत असतात. त्यांच्या पायात कधीच चप्पल नसते. तसेच आजवर त्यांच्या नावावर स्वत:च घरही नाही.

१९८० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवत त्यांनी शिवप्रतिष्ठान या संघटनेची स्थापना केली. तेव्हांपासून ते आजवर ते शिव चरित्राच्या प्रसारासाठी काम करत आहेत. तसेच गड किल्यांच्या संवर्धनासाठी त्याचं विशेष काम आहे.

Sambhaji-Bhide guruji

कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नसणारे भिडे गुरुजींना राजकीय वर्तुळात विशेष मान आहे. गडकोट मोहिमेचे आमंत्रण देण्यासाठी कधीकाळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचे विमान उड्डाण देखील थांबवल्याच बोलल जात. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक राजकीय नेते त्यांना आदर्श मानतात.Loading…


Loading…

Loading...