भाजप आमदाराच्या भावाची मुजोरी; भांडणे सोडवण्यासाठी गेलेल्या महिलेस मारहाण 

bjp flag

पुणे: हडपसर मतदार संघाचे आमदार तसेच भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर यांच्या भावाने महिलेस मारहाण केल्याची घटना घडली आहे. चेतन टिळेकर असे आमदार भावाचे नाव असून, या प्रकरणी सीताबाई गीते ( वय 40, राहणार. भोलेनाथ चौक. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.

सीताबाई गीते यांचा मुलगा अतुल आणि चेतन टिळेकर यांच्या चालकाची 23 फेब्रुवारी रोजी भांडणे झाली होती.  ही भांडणे मिटवण्याचे कारण देत चेतन टिळेकरने अतुलला टिळेकरवाड्यात बोलवुन घेतले. दरम्यान, माझ्या चालकाला का भांडतो म्हणत चेतन यांनी अतुल गीतेस मारहाण केली, यावेळी ही भांडणे सोडवण्यासाठी  गेलेल्या सीताबाई यांना देखील मारहाण करण्यात आल्याचे पोलीस फिर्यादीमध्ये सांगण्यात आलं आहे.