अखेर एकनाथ खडसेंच्या विरोधात गुन्हा दाखल

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात अपशब्द वापरल्या प्रकरणी भाजप नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजली दमानिया यांच्या तक्रारी वरून मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खडसे यांनी वाढदिवसाच्या कार्यक्रमात मुक्ताईनगरमध्ये आपल्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरल्याचं आरोप दमानिया यांनी केला होता. खडसे यांनी वापरलेल्या अपशब्दाचा व्हिडिओ आपल्याकडे असल्याचा दावाही दामानिया यांनी केला. तसेच त्यांनी हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

You might also like
Comments
Loading...