‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’वर राष्ट्रवादीकडून गुन्हा दाखल; सुप्रिया सुळेंची बदनामी केल्याचा आरोप

devendra fadnvis for maharashtra fb page

देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र( www.facebook.com/FadnavisforMaharashtra) या फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे आणि इतर राष्ट्रवादी कॉंग्रेस नेत्यांची बदनामी केल्याप्रकरणी पुण्यात या पेज विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या युवती अध्यक्ष मानली भिलारे यांनी पोलिसांकडे या संबंधीचा तक्रारी अर्ज दाखल केला  होता. त्यानंतर आता पोलिसांनी सायबर कायद्या अंतर्गत अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला असून संबंधित पेज अॅडमिनचा शोध घेतला जात आहे.

संबंधित फेसबुक पेजवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे यांचे फोटो एडीटकरून आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडीयावर व्हायरल केला जात असल्याच या तक्रारीमध्ये सांगण्यात आला आहे. तसेच सुप्रिया सुळे यांच्या पोस्टमध्ये महिलांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येत असल्याचही सांगण्यात आले आहे.

दरम्यान या बद्दल भिलारे यांना विचारल असता ‘ देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या पेजवरून फोटो एडीट करत राष्ट्रवादी नेत्यांनी न केलेलं भाष्य पोस्ट केले जातात. कमेंटमध्ये महिलांविषयी चुकीची भाषा वापरली जाते त्यामुळे संबंधित पेजवर कारवाई करण्याची मागणी केल्याच सांगितले.

‘सुप्रिया सुळे एफसी पेजवरून भाजप नेत्यांवर निशाना!
एका बाजूला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावाने चालणाऱ्या पेजवरून राष्ट्रवादी नेत्यांवर आक्षेपार्ह टिप्पणी करत बदनामी केली जात असल्याच दिसत आहे. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे एफसी या नावाने चालवल्या जाणाऱ्या पेजवरून मुखमंत्री तसेच इतर भाजप नेत्यांवरही आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात आहेत. यामुळे एका बाजूला खुल्या सभांमध्ये राजकारणी एकमेकाचे वाभाडे काढताना दिसतात तर दुसरीकडे त्यांचे समर्थक आक्षेपार्ह भाषा वापरत सोशल मिडीयावर नेत्यांची बदनामी करताना दिसत आहेत. दरम्यान दोन्ही पेज आमचे अधिकृत नसल्याच भाजप आणि राष्ट्रवादीकडूनही सांगितले जात आहे.