निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी शिवसेना उमेदवारावर गुन्हा दाखल

shivsena flag

टीम महाराष्ट्र देशा – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे. निवडणुकीचे मतदान पार पडताना काही ठिकाणी अनुचित प्रकार घडला. इअतर ठिकाणी मात्र शांततेत मतदान पार पडले.

शिवसेनेचे उमेदवार आणि माजी पोलीस अधिकारी तसेच एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकाऱ्याला धमकी दिली आहे. प्रदीप शर्मा यांनी निवडणूक अधिकारी बाळासाहेब मालोंडे यांना मतदान केंद्रावरचं बघून घेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे मालोंडे यांनी केलेल्या तक्रारीवरून विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

शिवसेनेच्या प्रदीप शर्मा यांची लढत ही बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांच्याशी होत आहे. प्रचारच्या वेळी या दोनही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अनेकवेळा वाद झाल्या असल्याचा तक्रारी आल्या होत्या. आणि आता निवडणूक अधिकाऱ्याला धमकावल्या प्रकरणी शर्मा यांच्यावर आयपीसी 186, 504, 506, लोकप्रतिनिधी कायदा कलम 131 (1)(2), 171 (ब) प्रमाणे विरार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राज्यात सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे ५८.४९ टक्के मतदान झाले. सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत ६४.२५ टक्के मतदान झाले असल्याचे माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली आहे. तसेच कोल्हापूरात तब्बल ७४ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या