शरद पवारांवर सोशल मिडियावरून विखारी संदेश प्रसारित केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

समाजमाध्यमातून शरद पवारांवर कमेंट केल्याप्रकरणी ठाण्यात गुन्हा दाखल

ठाणे : सोशल मिडीयावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्थ कमेंट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ‘देशहितासाठी शरद पवारसारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही’, अशी विखारी प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर नोंदविणाऱ्या व्यक्तीविरोधात ठाणे पोलिसांच्या सायबर गुन्हे अन्वेषण शाखेने गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या कारवाईसाठी पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड आणि स्थानिक नेत्यांनी ठाणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली आणि त्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला.

काय आहे प्रकरण

कोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ बुधवारी संपूर्ण राज्यात बंद पाळण्यात आला होता. वातावरण अजूनही निवळले नसतानाच या प्रकरणावरून राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर समाजमाध्यमांवर आक्षेपार्थ संदेश प्रसारित करण्यात आला आहे. ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ या फेसबुक पेजवर हा संदेश प्रसारित करण्यात आला आहे. या संदेशावर अवधूत प्रकाशराव शिंदे याने एक प्रतिक्रिया नोंदविली असून त्यामध्ये ‘देशहितासाठी शरद पवार सारख्यांची हत्या केली तरी पाप लागणार नाही’, असे म्हटले आहे. या प्रतिक्रियेच्या पाश्र्वभूमीवर आमदार जितेंद्र आव्हाड, शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी शुक्रवारी सकाळी ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची भेट घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.

You might also like
Comments
Loading...