कर्नाटकमध्ये संभाजी भिडेंवर गुन्हा दाखल

sambhaji bhide

टीम महाराष्ट्र देशा- कोरगाव भीमा दंगल झाल्यानंतर राज्यभर चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांच्या विरुद्ध बेळगावमध्ये अचारसंहितेचा भंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेळगावच्या येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र मैदानावर बोलताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन देण्याचं आवाहन भिडे यांनी केलं होत. विशेष म्हणजे निवडणूक आयोगाच्या तक्रारीवरुनच बेळगाव पोलिसांनी संभाजीराव भिडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय म्हणाले होते संभाजी भिडे ?

येळ्ळूरचे महाराष्ट्र मैदान हे देशातील अव्वल दर्जाचे कुस्ती मैदान आहे. या मैदानाला तोड नसून त्या माजी आमदाराला हे मैदान उद्धवस्त करायचे होते. त्याला त्याची जागा दाखवून द्या. येत्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन मराठी बाणा दाखवा .