ईव्हीएमची पूजा करणे पडले महागात, पाचपुतेंविरोधात गुन्हा दाखल

blank

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे. राज्यात भाजप पुन्हा सत्ता राखणार की सत्तांतर होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे.

सोमवारी मतदाना पार पडत असताना काही ठिकाणी अनुचित प्रकार घडला. यात बऱ्याच ठिकाणी हाणामारी पहायला मिळाली. श्रीगोंदा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी ईव्हीएमची पूजा केल्याने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच अहमदनगर जिल्ह्यात इतर ठिकाणीही वेग्वीग्ल्या घटना घडल्या. कर्जत जामखेड मध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटताना रंगेहात पकडले. तर पाथर्डी मध्ये मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, मतदानानंतर राज्यात एक्झिट पोल समोर आले आहेत. NEWS18 लोकमतच्या एक्झिट पोलनुसार भाजपला – 144, शिवसेनेला – 99 , राष्ट्रवादी कॉंग्रेस – 22, कॉंग्रेस – 17 एवढ्या जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महायुतीला तब्बल 243 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या