निकालापूर्वीचं विजयी मिरवणूक काढणाऱ्या राष्ट्रवादीच्या उमेदवारावर गुन्हा दाखल

blank

टीम महाराष्ट्र देशा – विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात सोमवारी मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. आता सर्वांना २४ तारखेला होणाऱ्या मतमोजणीची ओढ लागलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचे उमेदवार संजय कदम यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर कदम आणि समर्थकांनी खेड ते भरणे नाका याठिकाणी मिरवणूक काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी कदम यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांना समज दिली.

पोलिसांच्या या आवाहनाला न जुमानता संजय कदम यांचा समर्थकांनी मिरवणूक चालू ठेवली. त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली. पोलिसांनी त्यांच्यावर निवडणूक आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी कलम 143, 147, 149, 268, 290 अंतर्गत  यांच्यावर खेड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पुण्यात निकालापूर्वीचं राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे बॅनर लावल्याची घटना घडली आहे. तसेच कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनीही विजयी मिरवणुक काढली होती त्यामुळे त्यांच्यावरही करवाई होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या