नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करा !- अशोक चव्हाण

सर्व आघाड्यावर अपयशी ठरल्याने मोदींकडून उपोषणाचे ढोंग

मुंबई: यवतमाळ जिल्ह्यातील राजूरवाडी येथील शेतकरी शंकर चायरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जबादार ठरवून मंगळवारी आत्महत्या केली. त्यामुळे विरोधकांनी भाजप सरकारला लक्ष केले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी चायरे कुटुंबियांच्या मागणी प्रमाणे शंकर चायरे यांच्या आत्महत्येप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. तसेच चायरे कुटुंबियांच्या मागणीला पाठींबा दर्शविला आहे.

‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमात दिलेली आश्वासने जुमले ठरली

भाजपच्या सत्ताकाळात राज्यात १३ हजारांपेक्षा अधिक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. या अगोदर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन राज्यातील अनेक शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. परंतु यवतमाळमध्ये ज्या ठिकाणी ‘चाय पे चर्चा’ या कार्यक्रमाद्वारे मोदीजींनी २०१४ साली आपल्या प्रचाराची आणि देशाला दिलेल्या आश्वासनांची सुरुवात केली. त्याच यवतमाळ जिल्ह्यात दोन शेतकरी पंतप्रधानांचे नाव सुसाईड नोटमध्ये लिहून आत्महत्या करतात हे दुर्देवाचे आहे. मोदीजी उपोषण करित असताना आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी होते हा देशातील खरा विरोधाभास आहे असे खा. चव्हाण म्हणाले.

उपोषणाचे नाटक करून चालणार नाही

संसद चालवायची जबाबदारी सरकारची असते असे विरोधी पक्षात असताना अरूण जेटली स्वतः म्हणाले होते. आज मोदींना त्यांच्या वक्तव्याचा सोयीस्कर पणे विसर पडला आहे. देशपातळीवर मोदींचा प्रचंड विरोध होत आहे. केंद्रातले सरकार सर्वच आघाड्यांवर सरकार नापास झाले आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष असून शेतक-यांसहित समाजातील सर्व वर्ग रस्त्यावर उतरले आहेत. अशावेळी उपोषणाचे नाटक करून चालणार नाही. पुण्यातील भाजपच्या आमदारांनी उपोषणावेळी नाश्ता करून आणि स्वतः पंतप्रधानांच्या दौ-यात उपोषणासाठी जाताना व उपोषणावरून परत येताना नाश्त्यासाठी केलेल्या व्यवस्थेवरून मोदींचे उपोषण हे ढोंग आहे हे स्पष्ट झाले आहे, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी लगावला.

You might also like
Comments
Loading...