कोरोना : शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या ‘त्या पत्रकाराविरोधात गुन्हा दाखल

jail

भोपाळ : मध्य प्रदेशामधील भोपाळ शहरात राहणाऱ्या एका पत्रकाराच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. यानंतर त्या पत्रकारालादेखील आता कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. यात विशेष म्हणजे कोरोनाबाधित पत्रकार मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या शेवटच्या पत्रकार परिषदेत उपस्थित होता. त्यामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहणाऱ्या या पत्रकाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लंडनमधून मायदेशी परतलेल्या मुलीला क्वारंटाईन करण्यात आले असतानाही, या पत्रकाराने पत्रकार परिषदेत उपस्थिती लावल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. मध्य प्रदेशमध्ये २० मार्च रोजी घेण्यात आलेल्या या पत्रकार परिषदेत उपस्थित राहणाऱ्या या पत्रकारामुळे इतर पत्रकारांसह राजकीय नेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशव्यापी लॉकडाऊन घोषित केल्यानंतर आज शनिवारी चौथा दिवस आहे. भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असून केंद्र सरकारसह देशातील सर्व राज्य विशेष खबरदारी घेत उपाययोजना करत आहेत.नागरिकांना घरामध्येच राहण्याच्या वारंवार सूचना देवून देखील लोक अजूनही बाहेर फिरत असल्याचे चित्र आहे.