‘फिनटेक’मुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

fintech software launch and MOU-2

मुंबई  : ‘फिनटेक’मुळे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मोठा सकारात्मक बदल होऊन ग्राम पातळीपर्यंत विकासाला चालना मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ते हॉटेल ट्रायडेंट येथे माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आयोजित मुंबई फिनटेक फेस्टिव्हलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

श्री. फडणवीस म्हणाले, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मोठे बदल होत असून जगाचा चेहरामोहरा बदलत आहे. अर्थकारण झपाट्याने बदलत आहे. खऱ्या अर्थाने डिजिटल युग सुरु झाले आहे. महाराष्ट्र राज्याने नुकतेच फिनटेक धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टार्ट अप्सची उभारणी होणार आहे. जागतिक स्तरावर महाराष्ट्राला पहिल्या पाच फायनान्शियल टेक्नॉलॉजी केंद्रामध्ये स्थान मिळेल. पुढील 3 वर्षात महाराष्ट्र राज्य बदललेले असेल. शहरापासून ते खेड्यापाड्यापर्यंत आणि श्रीमंतापासून ते गरीब माणसापर्यंत या डिजिटल तंत्राज्ञनाचे फायदे पोहचणार आहेत. खासगी आणि सरकारी कामकाजाचा वेग वाढून त्यात पारदर्शकता येणार आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत याचे लाभ नक्कीच मिळतील. महाराष्ट्राच्या विकासाबाबत ते म्हणाले, पुढील 3 वर्षात या राज्याची वाटचाल ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे होईल. बॅकिंग, फायनान्शियल सर्व्हिसेस आणि इन्शुरन्स क्षेत्रातील फिनटेकचे महत्व पाहता मुंबई येथे जागतिक ‘फिनटेक हब’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला असे सांगून फिनटेक फेस्टिव्हलला देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

Loading...