एक दौड एकतेसाठी; पुण्यात भव्य राष्ट्रीय एकता दौड संपन्न

ekata 1 daud

पुणे: देशाचे माजी उपपंतप्रधान लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४२ व्या जयंतीनिमित्त पुण्यात आज भव्य एकता दौड चे आयोजन करण्यात आले होते. पुण्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व पुणेकर मोठ्या संख्येनेउपस्थित होते.

खंडूजीबाबा चौक, संभाजी पूल, आलका टॉकीज चौक, साहित्य परिषद, महाराष्ट्र मंडळ करत स.प.महाविद्यालयात या एकता दौडचा शेवट झाला. यामधे पुण्यातील अनेक शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्याचबरोबर पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, योगेश गोगावले यासह अनेक क्रीड़ा प्रेमी यावेळी या एकता दौड कार्यक्रमात सहभागी झाले होते.