fbpx

खेड घाटातील बाह्यवळण कामे लवकर पूर्ण करा ; अमोल कोल्हेंच्या अधिकाऱ्यांना सूचना

टीम महाराष्ट्र देशा : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज पुणे-नाशिक रस्त्यावरील खेड घाटाची पाहणी केली तसेच बाधित शेतक-यांच्या समस्या जाणून घेतल्या. वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने घाटातील बाह्यवळण कामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

यावेळी बोलताना ‘वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. पुणे-नाशिक मार्गावरची वाहतूक समस्या ही दिवसें-दिवस वाढत चालली आहे. याकडे कदापी दुर्लक्ष करून चालणार नाही’ असेे डॉ. कोल्हे म्हणाले. याबरोबरच प्रकल्पबाधित शेतक-यांना विश्वासात घेऊन त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनी शेतक-यांना विश्वासात न घेता अधिका-यांना सोबत घेऊन जमीन अधिग्रहित केली तसेच स्वार्थासाठी व स्वत:ची जमीन वाचविण्यासाठी आमच्या जमिनी घालवल्याचा आरोप शेतक-यांनी केला.

दरम्यान, अमोल कोल्हे यांच्या सोबत खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे खेड तालुका अध्यक्ष कैलासराव सांडभोर यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.