fbpx

अधिवेशन एक दिवसावर आलं असताना नागपूरच्या आमदार निवासात आढळला मृतदेह

नागपूर : नागपूरमध्ये ४ तारखेपासून पावसाळी अधिवेशनाला सुरवात होत आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर आणि विधानभवन परिसरात कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आल्या आहे. मात्र असं असतानाही नागपूरच्या आमदार निवासात मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ उडालीये.

विधीमंडळाचं नागपूरमध्ये होणारं पावसाळी अधिवेशन एक दिवसावर आलं आहे. आणि आमदार निवासात एक मृतदेह आढळून आल्यानं पुन्हा एकदा सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मृत व्यक्ती ही शिवसेना आमदार रमेश लटके यांचा (पी.ए.) असल्याची माहिती समोर येतीये.

विनोद अग्रवाल असं मृत व्यक्तीचं नाव आहे. आमदार निवास भवनातील ४३ नंबर च्या खोलीत आज सकाळी ते मृतावस्थेत आढळून आले. हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक माहिती आहे. रमेश लटके हे मुंबईतील अंधेरी पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचं प्रतिनिधित्व करतात. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

योगी आदित्यनाथानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना होमग्राउंड नागपूरमध्ये झटका

फडणवीसांच्या सहमतीनं हजारो कोटींचा जमिन घोटाळा – काँग्रेस

अंधेरी पूल दुर्घटना; मुंबईकरांना करावा लागेल ‘या’ पर्यायी मार्गाने प्रवास

2 Comments

Click here to post a comment