कुठे होणार अंतिम कसोटी सामना जाणून घ्या

birjben

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान होणाऱ्या चौथ्या आणि अंतिम सामन्यासाठी टीम इंडिया मंगळवारी ब्रिस्बेन येथे पोहोचली. या पूर्वी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे पार पडलेल्या सामन्यामध्ये विहारी आणि अश्विनने शानदार भागीदारी केली आणि १-१ असा सामना बरोबरीचा झाला.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत संघात सुरु असलेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी या कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा कसोटी सामना शुक्रवारपासून उद्या पासून सुरु होणार आहे. हा सामना २०२०-२१ ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील हा शेवटचा सामना आहे. त्यामुळे त्यामुळे भारतीय संघ दौऱ्याचा शेवट हा सामना जिंकून मालिका विजयासह गोड करण्याच्या उद्देशानं मैदानात उतरेल, तर घरच्या मालिकेत विजय मिळवण्याचा आणि ब्रिस्बेन येथील गेल्या ३ दशकाचा विजयी इतिहास कायम राखण्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ खेळेल.

ब्रिस्बेन येथे होणारा हा सामना कसोटी मालिकेतील निर्णायक सामना आहे. कारण या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता, तसेच तिसरा सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे ही मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. त्यामुळे हा सामना जो जिंकेल तो संघ मालिका जिंकेल.

ब्रिस्बेनला होणारा हा सामना १५ जानेवारी ते १९ जानेवारी दरम्यान होणार असून या सामन्यातील खेळाला प्रत्येक दिवशी भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.३० वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यातील बराच वेळ पावसामुळे खराब होण्याची शक्यता आहे. कारण हवामानाच्या अंदाजानुसार या सामन्याच्या दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी पाऊस येण्याची शक्यता दाट आहे.

महत्वाच्या बातम्या