जाणून घ्या एलआयसीची न्यू नवी बॅक पॉलिसीमध्ये बचत करा आणि मिळावा 23 लाख रुपये !

एलआयसी

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. एलआयसी ही कंपनी पूर्णपणे भारत सरकारच्या मालकीची आहे.१८१८ मध्ये ओरिएंटल लाइफ इन्शुरन्स कंपनी ही भारतात जीवनविमा व्यवसाय सुरु करणारी पहिली विमा कंपनी आहे.

गेले अनेक दशके एलआयसी हा भारतीय समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग राहिला आहे. सध्या १३,३७,०६४ इतके एलआयसी एजंट भारतभर कार्यरत आहेत. स्थापनेपासून गेल्या ६० वर्षात आणि उदारीकरणानंतरही जीवन विम्यात एल आय सी ची मक्तेदारी राहिली आहे. मुख्यतः जीवन विमा सेवा पुरवणाऱ्या एलआयसीने गेल्या काही वर्षांपासून इतर आर्थिक उत्पादने देखील बाजारात आणली आहेत. युलिप, म्युच्युअल फंड, गृहकर्ज इत्यादी सेवा सध्या एलआयसीमार्फत पुरवल्या जातात.

भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी एलआयसीच्या अनेक पॉलिसी पॉप्युलर आहेत. काही पॉलिसी लाँग टर्म तर काही छोट्या कालावधीसाठी आहेत. जर छोटी गुंतवणूक करायची असेल, तर न्यू मनीबॅक पॉलिसी एक चांगला पर्याय आहे.

एलआयसीची न्यू नवी बॅक पॉलिसी एक नॉन लिंक्ड इन्शोरन्स पॉलिसी आहे, यामध्ये बचत केल्यास ग्राहकांना चांगले रिटर्स आणि बोनस देते. या पॉलिसीची खास बाब म्हणजे यात दर पाच वर्षांनी मनी बॅक, मॅच्योरिटीमध्ये चांगले रिटर्स आणि टॅक्स इन्शोरन्स बेनिफिटही मिळतात. ही पॉलिसी पूर्णपणे टॅक्स फ्री पॉलिसी आहे. याच्या व्याज, प्रीमियम पेमेंट आणि मॅच्योरिटीवर मिळणाऱ्या रकमेवर कोणताही टॅक्स लागत नाही. या प्लॅनमध्ये जर तुम्ही 25 वर्षापर्यंत दररोज 160 रुपये गुंतवणूक केल्यास, 25 वर्षांनंतर 23 लाख रुपयांपर्यंत रक्कम मिळेल.

एलआयसी नुसार, हा प्लॅन 13 ते 50 वर्षापर्यंत कोणताही व्यक्ती घेऊ शकतो. या प्लॅनमध्ये प्रत्येक पाचव्या वर्षी म्हणजे 5, 10, 15 आणि 20व्या वर्षी 15-20 टक्के मनी बॅक मिळेल. परंतु ज्यावेळी प्रीमियम कमीत कमी 10 टक्के जमा असेल, त्यावेळीच हे मिळू शकेल. या मॅच्योरिटीवेळी गुंतवणूकदारांना बोनस मिळेल. एकूण 10 लाख रुपयांच्या या प्लॅनमध्ये अपघाती मृत्यूचे संरक्षण देखील मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या