जाणून घ्या, हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घोषित करताना नेमकं काय म्हटलं ?

Harshvardhan Jadhav

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. तो म्हणजे हर्षवर्धन जाधव यांनी राजकीय संन्यास घेतला आहे. हर्षवर्धन जाधव यांनी स्वत: सोशल मीडियावरून ही माहिती दिली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी शनिवारी सोशल मीडियावर एका व्हिडिओ पोस्ट केला. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राजकीय संन्यास घेत असल्याचं हर्षवर्धन जाधव यांनी जाहीर केलं आहे. हर्षवर्धन जाधव सध्या महाबळेश्वरला एका मेडिटेशन सेंटरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे.

मी राजकारणातून निवृत्ती घेतोय ! हर्षवर्धन जाधवांचा मोठा निर्णय

हर्षवर्धन जाधव याचं नेमकं काय म्हणणे आहे ?

लॉकडाउन सुरु असल्याने सर्वजण वाचनाचा छंद जोपासत आहेत. मी देखील माझा अध्यात्मिक वाचनाचा छंद जोपासला. यामधून आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो त्याची जाणीव मला झाली. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. माझ्या राजकारणाची उत्तराधिकारी माझी पत्नी संजना जाधव असेल. आपल्याला जे काही प्रश्न असतील ते तुम्ही संजना जाधव यांच्याकडून सोडवून घ्यावेत अशी विनंती मी करतो.

प्रत्येक घरात वाद होत असतात. पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ नये. मी संजना जाधव यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. रावसाहेब दानवेंच्या आशिर्वादाने आणि नेतृत्त्वाखाली संजना जाधव उत्तुंग भरारी घेतील याबाबत मनात शंका नाही. आपण सर्वांना राजकीय, शासकीय मदतीसाठी संजना जाधव यांच्याशी संपर्क साधावा.

#व्यक्तिविशेष : खा.छत्रपती संभाजीराजे भोसले ….दीनदुबळ्यांसाठी लोकहितासाठी, सर्वसामान्यांसाठी झटणारा खरा लोकनेता

खासगी दवाखाने बंद ठेवणाऱ्या डॉक्टरांचे परवाने होणार रद्द