fbpx

Facebook: फेसबुकवर शोधा सिटी

फेसबुक नेहमीच सोशल नेटवर्कींगच्या पलीकडे जाऊन आपल्या युजर्सला नवनवीन फिचर देण्याचा प्रयत्न करत असते. त्यात फेसबुकने नुकतेच ‘सिटी गाईड’ हे फिचर अ‍ॅड केले असून या फीचरमुळे कोणत्याही युजरला विविध ठिकाणांबद्दल माहिती मिळणार असून या फिचरची सुविधा ‘ट्रिप अ‍ॅडव्हायजर’ या संकेतस्थळाप्रमाणे देण्यात आली आहे.
या फिचरमध्ये आंतरराष्ट्रीय ते स्थानिक पातळीपर्यंतच्या सर्व ठिकाणाचा समावेश असणार आहे. फेसबुकच्या कोणत्याही युजरला त्याच्या मित्रांनी भेट दिलेली शहरे आणि त्यातील विविध ठिकाणांची माहितीसुद्धा पाहता येणार आहे. सोबतच या ठिकाणांना भेट देण्याच्या नियोजनासाठी त्या ठिकाणांना ‘प्लॅनर’मध्ये टाकता येणार आहे. याची सर्व माहिती ‘एक्सप्लोअर’ या एकाच ठिकाणी पाहता येणार असून सध्या हे फिचर अँड्रॉइड आणि आयओएस प्रणाली वापरणार्‍या युजर्सला देण्यात आले आहे.