महामुलाखत: आर्थिक दृष्ट्या फक्त दुबळ्यांनाच आरक्षण मिळालं पाहिजे- शरद पवार

शरद पवार

पुणे: राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांची ऐतिहासिक मुलाखत राज ठाकरे हे पुण्यातील बीएमसीसी कॉलेजच्या मैदानावर घेतली. आरक्षणासंदर्भात बोलताना शरद पवार यांनी आर्थिक दृष्ट्या दुबळ्यांनाच फक्त आरक्षण मिळालं पाहिजे अशे मत स्पष्ट केले आहे.

पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयाच्या मैदानावर राज ठाकरे यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. दरम्यान, आर्थिक दृष्ट्या दुबळ्यांनाच फक्त आरक्षण मिळालं पाहिजे. तसेच दलित आदिवासींना जरूर आरक्षण द्यावं पण इतरांना जातीवर आधारित नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं. यासाठी मध्यंतरी मोर्चेही निघाले. असे राष्ट्रवादी कॉंग्रेस चे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं.Loading…
Loading...