नामवंत आय.बी.एस संस्थेकडून विद्यार्थांची आर्थिक लुट

abvp student

पुणे: हडपसर येथील नामवंत आय.बी.एस संस्थेतील एम.बी.ए च्या विद्यार्थांना जाणून बुजून परीक्षेत नापास केल्याचा प्रकार समोर आला आहे. यापूर्वी देखील विद्यार्थांना या संस्थेमध्ये अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयात आंदोलन केले.

हडपसर येथील नामवंत आय बी एस संस्था अनेक कारणांसाठी सतत चर्चेत येत असते. विद्यार्थांचा अंतर्गत गुणांचा प्रश्न असो, शैक्षणिक शुल्क बाबत अडचणी असो. यामध्ये विद्यार्थांची पिळवणूक होत आहे. अभावीपने या संस्थेने शिक्षणाचा धंदा मांडून ठेवला असल्याचा आरोप केला आहे.

विद्यार्थांना महाविद्यालय प्रशासनाकडून नापास करण्यात आले. जणेकरून विद्यार्थी पुन्हा परीक्षेला बसतील आणि प्रत्येक विषयास २५०० शुल्क भरतील तसेच महाविद्यालायाकडून विद्यार्थांना मानसिक त्रास दिला जात असल्याचे विद्यार्थांनी म्हटले आहे. यासंदर्भात महाविद्यालय प्रशासनाशी संपर्क केला असता संपर्क झाला नाही.

 

“शिक्षणाच्या माहेर घरात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास देऊन त्यांना पैशासाठी नापास करणे हे अतिशय निंदनीय आहे, अभाविप अश्या निंदनीय प्रकारचा तीव्र निषेध करते. इंटरनॅशनल बिझनेस स्कूल हडपसर मध्ये जो प्रकार घडत आहे तो पुण्यातील अनेक महाविद्यालयांमध्ये घडत आहे, अभाविप या विषयात गांभीर्याने लक्ष देत असून पुढील काळात विद्यार्थ्यांवर कोणताही अन्याय होऊ नये यासाठी संघर्ष करेन.”

– योगेश्वर पुरोहित, अभाविप मंत्री (गणेश खिंड भाग)

“कॉलेज मधील आमच्या सिनियर बॅच मधील विद्यार्थ्यांनी आम्हाला चुकीची माहिती दिल्यामुळे आम्ही ह्या कॉलेज मध्ये ऍडमिशन घेतली. पण इथे आल्यानंतर एक महिन्यापासूनच ह्यांचे खरे रंग दिसायला सुरुवात झाली होती. पण आईबापांचे कष्टाचे पैसे शिक्षणात लागलेत असं वाटून आम्ही सगळे विद्यार्थी शांत बसायचो. आता मात्र ह्यांच्या सगळ्या कामाचे जेव्हा आम्ही पुरावे गोळा केले तेव्हा समजले कि हा ह्यांचा नित्यक्रम आहे पोरांना फसवायचा. आणि मग आम्ही ह्यांना सांगून सुद्धा ह्याच्यात फरक पडत नाही म्हटल्यावरर आंदोलन करण्याशिवाय आमच्या कडे काहीही पर्याय नव्हता.”

– आशुतोष पर्वते, विद्यार्थी आयबीएस महाविद्यालय पुणे,हडपसर